Header Ads Widget

भर पावसाळ्यात रुई परिसरातील सात ही पाझर तलाव कोरडेच !

         माधव पवार 
नायागांव तालुक्यातील रुई बु रुई परिसरातील एकूण सात ही पाझर तलाव भर पावसाळ्यात कोरडेच असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

तालुक्यातील रुई बु साखर कारखाना सावरखेड कृष्णूर व अन्य ठिकाणचे ७ पाझर तलाव अध्याप कोरडेच असून गेल्या वर्षी पहिल्याच पावसाने सात ही तलाव तुडुंब भरले होते परंतु पाऊस कमी प्रमाणात पडत असल्यामुळे पाण्या विना कोरडेच असल्याचे दिसून येत आहे 

यंदा शेतकऱ्यानी कमी पावसातच पेरणी केली असली शेतकऱ्यांच्या पिकाची उगवण झाली असली शेतकऱ्यांना मोठया पावसाची आवश्यकता असल्यामुळे मोठा पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे 

Post a Comment

0 Comments