राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काढण्यात आली असल्यामुळे महिला वर्ग मोठया अशाने तुटपुंज्या १५ ०० रुपयाच्या हप्त्याकडे डोळे लावून आहेत
शासनाने फार असे योजनेला महत्व देण्या पेक्षा गावाच्या विकासासाठी जर मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला तर गावच्या विकास झाल्या शिवाय राहत नाही अनेक गावात चिखलमय रस्ते झाले आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढल्यामुळे अख प्रशासन त्या कामात मग्न असल्यामुळे कोणतेच जनतेचे व जन सामान्य माणसाचे कामे नीट होत नाहीत प्रशासन आता गावा गावात ग्रामपंचायत कार्यालयात माझी लाडकी बहीण योजनेसाठी शिबिराचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करीत असून ते शिबीर नको चिखलमय झालेल्या रस्त्याची व विकास करण्याची नागरिकांना गरज भासत आहे
अनेक गावा मध्ये सरपंच व ग्रामसेवकाच्या हलगर्जी पणामुळे विकास रेंगाळत असल्यामुळे सदरच्या योजनेवर मोठा भर देण्या ऐवजी जर शासन व संबंधित ग्रामपंचायत कार्यालाय विकासावर लक्ष केंद्रित केले तर नक्की गावच्या विकासाला चालना मिळणार आहे

0 Comments