Header Ads Widget

खासगी कंपन्यांचा मोबाइल रिचार्ज परवडेना नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क

        नागोराव शिंदे 
हिमायतनगर.  अनेक आमिषे दाखवून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या मोबाइल कंपन्यांनी रिचार्जचे २५ टक्के भाव वाढविले आहे. सर्वसामान्य ग्राहकाला हे परवडणारे झाले नाही.

त्यामुळे केंद्र सरकारच्या बीएसएनएलने आपले जाळे वाढवून सेवा दिली तर खासगी सीमकार्ड धारक आपले क्रमांक पोर्ट करून बीएसएनएलकडे वळविण्याच्या तयारीत आहेत. 

बीएसएनएलने सेवा सुरू करण्याची अपेक्षा  खासगी कंपनीच्या मोबाइलच्या सीमकार्डचे रिचार्ज साध्या मोबाइलचे केवळ आउट गोइंग आणि ईन कमिंग कॉल घेण्यासाठी वापरणाऱ्या सीमकार्डचे रिचार्ज १७९ रुपया वरून १९९ रुपये, तर अँड्रॉइड मोबाइल डेटा २८ दिवसाच्या रिचार्जसाठी २३९ रुपये मोजावे लागायचे. आता ते २९९ रुपयांवर गेले आहे.

एकेकाळी बीएसएनएलने हिमायतनगर या आदिवासी बहुल भागात भरारी घेतली होती. टेलिफोन, मोबाइल सीमकार्ड व इतर इंटरनेटची सेवा दिली होती. कृषीचे सीमकार्ड देऊन कमी पैशात चांगली फॅशिलिटी दिली होती. तेव्हा जो तो बीएसएनएलच्याच सीमची मागणी करत होते

Post a Comment

0 Comments