Header Ads Widget

बाबुराव कदम कोहळिकर यांच्या प्रयत्नातून आनंद अनुभूती शिबीराचे आयोजन

       नागोराव शिंदे 
हिमायतनगर.   हदगाव येथील हायटेक इंग्लिश स्कूलच्या मैदानात बाबुराव कदम कोहळिकर यांच्या प्रयत्नाने आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून ज्ञानेशभक्त महेश महाराज शेवाळकर राहणार आहेत.

या कार्यक्रमात शिका जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया या मार्गदर्शनात २२ जुलै ते २७ जुलै पाच दिवसांसाठी या कार्यकाळात सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी ते सकाळी ८ ३० वाजेपर्यंत राहील हे कार्यक्रम निशुल्क आहे 

यात कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही. या शिबिरात उत्साह स्वास्थ निरोगी शरीर सकारात्मकता आत्मविश्वास तणाव मुक्त शांतता आनंदी मन एकाग्रता चांगले नातेसंबंध उत्तम जीवनशैली सुदर्शन क्रिया अशा अनेक जीवन उपयोगी आनंद अनुभूती शिबिर या कार्यक्रमात नागरिकांना प्रशिक्षण मिळणार आहे. 

हदगाव  तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमाला हजेरी लावावी व या धकधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरावर व मनावर लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल करून घ्यावेत असे लोकनेते बाबुराव कदम कोहळिकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे

Post a Comment

0 Comments