Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी भाजपा पक्षात राजकीय स्पर्धक वाढले -

        माधव पवार 
लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आगामी काळातील नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या राजकीय पुढाऱ्यात मोठी चढाओड होत आहे 

या सदरच्या निवडणुकीसाठी नामवंत पुढारी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत असून भारतीय जनता पार्टीचे कमळ येणाऱ्या निवडणुकी मध्ये फुलविण्यासाठी अनेक पुढारी मोठा प्रयत्न करीत आहे 
नायगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार आहेत त्याच बरोबर आगामी काळातील नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी  सदरच्या मतदार संघाचा अभ्यास करण्यासाठी मा. शिवराज पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करून सदरचा मतदार संघ पिंजून काढत असताना दिसून येत आहे 

याच मतदार संघांचे नेतृत्व करण्यासाठी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सुद्धा जोरदार तयारी करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून नायागांवचे भाजपाचे बालाजी बच्चेवार व श्रावण पाटील भिलंवडे यांनी सुद्धा सदरच्या रिंगणात उतरण्यासाठी मोठा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे 

भाजपा पार्टीचे मा. शिवराज पाटील होटाळकर मा. राजेश पवार,कवळे गुरुजी. बालाजी बच्चेवार.श्रावण पाटील भिलंवडे आदी निवडणूक लढविणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments