माधव पवार
राज्यातल्या राज्य कर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण ही योजना राज्यात राबविलेली असल्यामुळे जिल्हा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यासह मुख्यकार्यकारी अधिकारी यांना मोठा सहभाग घेऊन सदरची योजना प्रभावी पणे राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे
मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचे फार्म ऑनलाईन करण्यासाठी कोणी ही फुकट काम करीत नसल्यामुळे १ ते दीड हाजार रुपये खर्च येत असला तरी सदर काम वेळेवर होत नसल्यामुळे लाडकी बहीण हैराण होताना दिसून येत आहे
लाडकी माझी बहीण या योजनेसाठी जिल्हा प्रशासन ही मोठया प्रमाणात व्यस्त असल्याचे दिसून येत सदर फार्म भरीत असताना ऑनलाईन करण्यासाठी अप बरोबर चालत नसल्यामुळे फार्म भरण्यासाठी वेळ लागत असल्याचे फार्म भरण्यास गेलेल्या महिलातुन बोलल्या जात आहे

0 Comments