नायगाव तालुक्यातील धर्ती माता हिरवा शालू नेसली असल्यामुळे शेतातील पिके हिरवीगार दिसत असले मोठा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी राजा कमालीचा चिंतातूर झाला होता दिनांक ६ जुलै २०२४ रोजी ५ वाजण्याच्या दरम्यान पिकाला जिवदान मिळेल तेवढाच पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी थोडक्यात समाधान व्यक्त करीत आहे
तालुक्यातील यंदा शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागावड केली असून शेतकऱ्याच्या पेरण्या जवळ पास जून महिन्यातच अल्पशा पाऊस पडल्याने पेरण्या केल्या होत्या परंतु अनेक शेतकऱ्याच्या शेतातील बी बियाणे उगले नाहीत त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकरता येत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
गेल्या वर्षाच्या तुलनेत पाहिले तर यंदा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आदी पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली असून ७० टक्के सोयाबीन ५ टक्के मूग उडीत ५ टक्के तूर २० टक्के कापूस अशा पिकाची शेतकऱ्यानी लागवड यंदा केली आहे

0 Comments