जनसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मास आलेले या भागाचे शेतकरी नेते कवळे गुरुजी हे जनसामान्य माणसासह शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारा हा नेता शेतकऱ्यांसाठी सदाफुली असल्याचे प्रल्हाद हिवराळे यांनी सांगितले असून हा सदरचा नेता सत्तेत नसताना सुद्धा शेतकऱ्यांना स्वालंबी बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत
या भागासाठी बाबासाहेब देशमुख गोरठेकर व बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी सिंचनाची मोठया प्रमाणात शेतकऱ्यांसाठी मोठी सोय केले यांचे ऋण कोणी विसरता कामा नये असे ही प्रल्हाद हिवराळे यांनी आवर्जून सांगितले आहे
उमरी-धर्माबाद तालुक्यात कालवे काढुन सिंचनाची सोय केले. ऐवढेच न थाबंता बळेगाव येथे बॅरेजेस बांधले. म्हणून आज घडीला गोदाकाठावरील उमरी, धर्माबाद व नायगाव आधी तालुक्यातील गावातील शेतक-यांनी फायदा घेत आहेत
भागातील शेतक-यांचे आर्थिक बाजूने बळकट झाला पाहिजे.माझा शेतकरी कुणाकडे हात परसविण्याची पाळी येऊ देणार नाही.म्हणून शेतकरी,शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार युवक यांचे हित जोपासणारे उद्योगरत्न मारोतराव कवळे गुरूजी यांनी वाघलवाडा, सिंधी, येथे तिन कारखाने उभारले . कवळे गुरूजीने कारखाने उभारल्याने शाश्वत ऊस पिक समजुन भरमसाठ उत्पन्न काढत आहेत.
शेतक-यांच्या खिशात ऊसापोठी चार पैसे आल्याने व्यापारपेठ ही भरभराटीस आले.शेतकरी ऐवढ्यावरच न थांबता शेती जोड दुग्धव्यवसाय सांभाळत दुधापोटी दर आठवड्यात खेळता पैसा शेतक-यांच्या हात मिळत आहे
कारखाने व पतसंस्था,शिक्षण संस्था,गावोगाव दुध डेअरीअंतर्गत दहा हजार लोकांना रोजगार यातून मिळाले. ऐवढ्यावरच न थांबता समाजिक बांधिलकी जपत आपले कार्य चालू ठेवले आहे
आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना मदत करणे,जे शेतकरी असतील त्यांना ऊस उत्पादक साठी प्रशिक्षणाला पाठवणे, दुग्धव्यवसाय असो इतर व्यवसाय करणारे तरूण असो यांना यांचे प्रशिक्षण पाठवूण त्यांना व्यवसायसाठी सहकार्य केले असल्याचे प्रल्हाद हिवराळे यांनी माहिती दिली आहे

0 Comments