सरकारने केवायसीच्या नावाखाली गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरळ सरळ जमा करण्या ऐवजी प्रशासन केवायसीचा दांडू घातल्यामुळे व शेतकऱ्यांचा अंगठा येत नसल्याने केवायसी होत नाही शेतकरी राजा मोठ्या प्रमाणात हैराण झाला आहे
या नांदेड जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यासह खासदार व आमदारांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान केवायसी झाली नसल्याने व अंगठा येत नसल्याने शासकीय अनुदान मिळत नाही त्यावर काही आवाज उठवतील का ? असा सवाल शेतकरी आणि उपस्थित केला आहे
या राज्यातले राज्य सरकार जिल्हा प्रशासन झोपेचे सोंग घेतले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
ज्यावेळी मतदान केंद्रावर याच शेतकऱ्यां कडून मतदान करून घेण्यासाठी दहा पुराव्या पैकी कोणत्याही एका पुराव्याच्या आधारे मतदान करून घेता आणि याच शेतकऱ्याचा केवायसी करत असताना त्याचा अंगठा येत नाही त्यामुळे अनुदान रखडले यांच्या कडून एक तरी पुरावा मागून घेऊन अनुदान बँक खात्यात जमा का ? करण्यात येऊ नये असे शेतकऱ्याचे मत आहे
सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी साठी चाल ढकल करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
राज्यातल्या सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे व प्रशासकीय यंत्रणेमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे
प्रशासन केवायसी करण्यासाठी सांगत असला तरी ज्या शेतकऱ्याचे अंगठे येत नाहीत त्यावर कसल्याच प्रकारचा शासन पर्याय व्यवस्था काढत नाही ज्या शेतकऱ्याचा अंगठा येत नाही त्यावर काही महत्त्वाचे पुरावे घेऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान तात्काळ जमा करावे अशी शेतकरी आणि मागणी केली आहे

0 Comments