माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दी मधील सराईत आरोपी चंद्रकांत क्षीरसागर याच्यावर लोहा पोलीस स्टेशन येथे पाच गुन्हे दाखल असून
सदर आरोपी हा सतत एका मागून एक गुन्हे करत होता त्याच्यावर प्रतिबंधक कारवाया करून पण काही सुधारणा झाली नसल्याचे सांगण्यात येते आहे
लोहा पोलिसांनी त्यांचा हद्दपार प्रस्ताव पाठविला होता
उपविभागीय दंडाधिकारी कंधार श्रीमती अरुणा संगेवार मॅडम यांनी त्याचे हद्दपारचे आदेश काढले होते सदर आरोपीस नांदेड जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते.
हद्दपार करण्यात आले असताना सुद्धा त्याने पुन्हा नांदेड शहरां मध्ये प्रवेश केला केल्याचे आढळून आले सदर हद्दपार आरोपी नांदेड शहरांमध्ये आलेला असल्या बाबत गोपनीय माहिती नांदेड एलसीबीला प्राप्त झाली असल्यामुळे सदरच्या आरोपीला नांदेडच्या एलसीबीने ताब्यात घेतले शहरातून हद्दपार आरोपी चंद्रकांत क्षीरसागर यास अटक केल्याची माहिती मिळते आहे
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ व भारतीय दंड विधान कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते आहे

0 Comments