Header Ads Widget

राज्यातल्या दळभद्री सरकारच्या कार्यकाळात केवायसी झाली नसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान अध्याप मिळेना -

        माधव पवार 
महाराष्ट्रातल्या राजकारणाचा खेळ खंडोबा करून राज्यात अस्तित्वात आलेल्या दळभद्री  सरकारच्या कार्यकाळात वयोवृद्ध शेतकरी यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान केवायसी झाली नसल्यामुळे व त्यावर कोणताही शासन पर्याय काढत नसल्यामुळे शेतकरी अनुदाना पासून वंचित असल्याचे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात चित्र दिसून येत आहेत 

संबंधित कृषी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे कोणत्याही केवायसी झाले नसलेल्या शेतकऱ्याची चौकशी न करता कृषी विभाग अधिकाऱ्याकडून सदरचे पंतप्रधान सन्मान योजनेची पैसे असो की मुख्यमंत्री योजनेची रक्कम असो ही कृषी विभाग अधिकाऱ्याकडून बंद करण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यातुन संताप व्यक्त केला जात आहे 

राज्यातले दळभद्री सरकार हे शेतकऱ्यांचे हिताचे नसून ते सत्तेच्या लालचीचे असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात असले तरी शेतकऱ्याचे गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून तूटपुंजी मदत शासनाने जाहीर केली होती परंतु ती मदत वयोवृद्ध शेतकरी यांचे अंगठे येत नसल्याने केवायसी झाली नाही  त्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडले असल्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे 

सदरचे सरकार सांगतो की शेतकऱ्यांचे सरकार असल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचा तोटा व घटा होणार नाही असे एकीकडे शासन सांगतो तर दुसऱ्या बाजूने सदरचे दळभद्री सरकार हे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात वाटोळे केले असल्याचे स्पष्ट चित्र शेतकऱ्यांचे अनुदान होत नसल्याच्या कारणा वरून दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments