महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ प्रमाणे कारवाही करण्यात आली असून पोलीस स्टेशन लोहा हद्दी मधील आडगाव येथील चंद्रकांत मोहन क्षीरसागर यांस लोहा पोलिसांनी पाठवलेल्या तडीपार प्रस्तावा वरून उपविभागीय दंडाधिकारी कंधार अरुणा संगेवार मॅडम यांनी दोन वर्षासाठी नांदेड जिल्ह्यामधून हद्दपार केले आहे
त्यामुळे दोन वर्ष नांदेड जिल्ह्या मध्ये सदर तडीपार व्यक्तीस राहता येणार नाही लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील आडगाव येथील राहणारा चंद्रकांत मोहन क्षीरसागर हा व्यक्ती २०१६ पासून सराईत पणे गुन्हे करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे
सदर व्यक्तीवर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यास कायदेशीर कारवाई पण करण्यात आलेली असून अनेक वेळा प्रतिबंधक कारवाई करुन ही सदर व्यक्तीच्या वर्तनामध्ये परिवर्तन होत नाही त्यामुळे त्यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातुन हादपार करण्यात आल्याचे समजते आहे
सदर व्यक्तीची मागील हिस्ट्री पाहिली असता सदर व्यक्ती हा पुन्हा पुन्हा अपराध करण्याच्या बेतात दिसून येतो.
सदर व्यक्तीच्या हालचाली कृती या व्यक्तीस व मालमत्तेस भय धोका किंवा इजा निर्माण करण्याच्या दिसून येतात तसेच असा धोका इजा निर्माण होण्याचा संभव ही दिसून येतो
सदरचा व्यक्ती हा जबरीचा किंवा बळाचा उपयोग करून गुन्हे करतो तसेच सदर व्यक्तीने अशा प्रकारचे गुन्हे इतरांनी करावे म्हणून अपप्रेरणा पण दिलेली आहे.
सदर व्यक्तीवर पोस्टे लोहा येथे बेकायदेशीर जमाव जमवणे बेकायदेशीरपणे दंगा करणे, जबर मारहाण करणे, रेती चोरी करणे, अवैध हत्यार तलवार बाळगणे, सार्वजनिक मालमत्ता नुकसान करणे सार्वजनिक मालमत्तेचे वीरूपण करणे अशा गुन्ह्यास अपप्रेरणा देणे,
सायबर क्राईम इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीवर भारतीय दंड विधान १८६० शस्त्र अधिनियम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ महाराष्ट्र मालमत्ता विरूपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ प्रमाणे सदर आरोपी विरोधात पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हे दाखल आहेत

0 Comments