Header Ads Widget

हिमायतनगर पळसपुर डोलारी सिरपली रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून पुर्ण का होईना ग्रामस्थांनचा लोक प्रतिनिधींना सवाल

नागोराव शिंदे 
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी 
 हिमायतनगर.   केंद्र व राज्य शासनाने  खासदार आमदारांच्या  मागणीची दखल घेऊन हिमायतनगर पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत २०२२ मध्ये शुरू करण्यात आला दुर्दैवाने गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्यावरील तिन्ही गावच्या लोकांना हिमायतनगर-पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली रस्त्याचे अर्धवट काम मार्गी लागता लागेना ! उपोषणाला बसण्याची दुसयांदा वेळ आली आणि पाच दिवस उपोषण करुन सुध्दा काम आज पर्यंत सुरू झाले नाही . रस्त्याच्या अर्धवट अवस्थेमुळे वरील गावांसह विदर्भातील ढाणकी गावांसह विदर्भात जाण्यासाठी येण्यासाठी च्यार वर्षांपासून तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
प्रशासनाने सबंधितावर योग्य ती कारवाई करून या रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी पळसपूर, डोलारी, शिरपल्ली येथील ग्रामस्थानी साखळी उपोषण अवलंबले होते. तरी पण संबंधित गुत्तेदार आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे कानाडोळा केला असून आज पाचव्या वर्षी पावसाळा सुरू झाला आहे हा रस्ता पूर्ण झाला नाही या रस्त्यावरील फुलाचे आधारवटकाम असून या रस्त्यावर काही जीवितहानी पावसाळ्यात झाली तर याला जबाबदार प्रधानमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता की गुत्तेदार अश्या प्रतिक्रिया येथील नागरिकांतून उमटत आहेत

Post a Comment

0 Comments