Header Ads Widget

लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवाराला दिवसा आकाशातील तारे दिसू लागले ? जनतेचे स्पष्ट मत !!

         माधव पवार
राज्यातील विविध पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेच्या निवडणुकी मध्ये जस जसे मतदान जवळ येतोय तस तसे आकाशातील चांदणे दिवसाला ? दिसत असावेत असे जनतेतून स्पष्ट बोलल्या जात आहे

विविध पक्षांच्या माध्यमातून आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी नेते मंडळी मग्न असल्याने कमालीचे वातावरण पेटले की काय असा प्रश्न ही मतदारातुन व्यक्त केला जात आहे

लोकसभेच्या निवडणुका या अटीतटीच्या होत असल्यामुळे आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्याला बोलून जाहीर सभा घेण्यात येत असल्या तरी अनेक उमेदवाराचे तळ्यात की मळ्यात होताना दिसून येत असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे

सदरच्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये मतदार राजा निर्भीड पणे आपल्या मताचा अधिकार बसवणार असून शक्यतो मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे तमाम मतदारांना चांगलीच उत्सुकता लागली असून यात नवीन मतदाराच्या संख्येत चांगलीचे वाढ झाली असल्याचे दिसते आणि सदरच्या निवडणुकीसाठी प्रशासन ही सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

खरे तर लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवाराला दिवसा आकाशातील तारे दिसू लागले ? असल्याचे जनतेचे स्पष्ट मत आहे 

Post a Comment

0 Comments