Header Ads Widget

काँग्रेस पक्षासह भाजपा पक्ष एकमेकावर आरोप करण्यात पटाईत कोणी म्हणतो ७० वर्षा पासून केले तर कोणी म्हणतो १० वर्षात काय केले जनते समोर हेच प्रश्न !!

                माधव पवार
काँग्रेसने सत्तर वर्ष काय केले आणि भाजपाने दहा वर्षात काय विकास केला असे आरोप एकमेकावर करत बसण्या पेक्षा देशासाठी व राज्यासाठी आता काय करता येते हे काँग्रेस आणि भाजपाने देशातील नागरिकांना सांगितले पाहिजे मता पुरते राजकारण करण्यासाठी देशातील व राज्यातील राजकीय नेते मंडळी पटाईत आहेत

या भारत भूमिसाठी या पुढे देश व राज्य कसे विकसित करता येईल असा विचार डोळ्या समोर या राज्य कर्त्यांनी केला पाहिजे या देशातील जनतेला आता काय अपेक्षित आहे यांच्याकडे कोणी तरी लक्ष देणार की नाही निवडणुका जवळ आल्यावरच काँग्रेस पक्षाने गेल्या ७० वर्षा पासून काय केले असा विषय समोर येत आहे

काँग्रेस पक्षा कडून असे आरोप केले जातात की भाजपा पक्षाने १० वर्षात काय केले हे एकमेकावर आरोप करत बसण्या पेक्षा देशाची व राज्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष असले पाहिजे नुसते फोडा फोडीचे राजकारण करत बसले तर कसल्याच प्रकारची प्रगती उन्नती होणार नाही असे जनतेचे मत आहे

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला शासनाचा हमीभाव असला पाहिजे देशात व राज्यात वाढत चाललेली महागाई कुठे तरी कमी असली पाहिजे गोरगरीब जनतेच्या हाताला रोजगार हमी योजने अंतर्गत काम असले पाहिजे राज्यासह खेड्यापाड्याचा विकास झकास असला पाहिजे असे जनतेचे मत आहे

देशातील व राज्यातील राजकीय नेते मंडळी केवळ लोकसभेच्या निवडणुका असो की विधानसभेच्या निवडणुका असो याच वेळी काँग्रेस पक्षाचा उल्लेख करीत ७० वर्षाचा विषय जनते समोर मांडत आहेत

या देशात भाजपाची सत्ता गेल्या दहा वर्षापासून असली तरी या भाजपाने दहा वर्षात काय केले असे एकमेकावर आरोप करीत बसण्यापेक्षा जनतेला सध्याच्या परिस्थिती मध्ये काय अपेक्षा आहे हे जनतेला दाखवून दिले पाहिजे असे हे जनतेचे स्पष्ट मत आहे 

Post a Comment

0 Comments