माधव पवार
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शासन अतिशय यंत्रणा सज्ज झाले असून त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील ८९ गावातील एकूण ३४९ बूथ निवडणुकीसाठी तयार असल्याची माहिती नायगावच्या एक जबादार महिला तहसीलदार धम्मप्रियाताई गायकवाड यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयांना पुरोगामी विचाराचे दोन वरिष्ठ अधिकारी एक महिला तहसीलदार धर्मप्रियाताई गायकवाड आणि गटविकास अधिकारी एल आर वाजे हे अतिशय उत्कृष्टपणे आपल्या कार्यालयाचा व प्रशासनाचा कारभार चालवीत आहेत
लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासन अतिशय सज्ज झाले असल्यामुळे या जिल्ह्यातील निवडणुका २६ एप्रिल २०२४ रोजी होत असल्याने नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी एल आर वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली एम डी ठाकूर यांनी तालुक्यातील सर्व म्हणजे ३४९ मतदान बुथाची पाहणी केले आहे
नायगाव तालुक्यासाठी व तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयांना अतिशय महत्वाचे अधिकारी लाभले आहेत यात नायागांवच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार धम्मप्रियाताई गायकवाड व पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी एल आर वाजे यांनी डोळ्यात तेल टाकून आपाआपल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवले आहे

0 Comments