Header Ads Widget

मोबाईल बनले उमेदवाराच्या प्रचाराचे एकमेव साधन खेड्या पाड्यात निवडणूकीचा प्रचार जोरात !!

          माधव पवार
नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा चांगलाच रंग भरत असल्यामुळे या सदरच्या निवडणुकी मध्ये महायुतीसह महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराच्या संदर्भात चांगलीच गती घेतले असल्याने आपापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर म्हणजे मोबाईलच्या द्वारे आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार जोरात करत आहेत

तंत्रज्ञानाच्या युगात टीव्ही चॅनल पेक्षा ही गतिमान बनलेले साधन म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून सर्वत्र खेड्यापाड्यात माहिती पोहोचत असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण असो की महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर असो यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्हाट्सअप वर जोरदार प्रचार चालू आहे

नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत माजी आमदार वसंतराव चव्हाण व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या तगडी लढत असल्यामुळे सदरच्या रणसंग्रामात काट्याची टक्कर असल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यासह महाविकास आघाडीच्या राजकीय पुढाऱ्यानी प्रचार करण्यासाठी चांगली मुसंडी मारली आहे 


Post a Comment

0 Comments