Header Ads Widget

पैनगंगा नदी काठावरील टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी गेल्या शिवाय ईसापुर धरणाचे पाणी बंद करणार नाही उपविभागीय अधिकारी घुगे

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिमायतनगर विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पेनगंगा नदी काठावरील गावांना  टंचाईच्या झळा बसत असल्याने युद्धपातळीवर प्रयत्न केल्याने यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्या कोट्यातून चार दलघन मीटर पाणी पेनगंगा नदी पात्रात कॅनॉल द्वारे गांजेगाव बंधाऱ्यांमध्ये सोडण्यात आले आहे

या पाण्याची पाहणी करण्यासाठी दिनांक १७ रोजी दुपारी एक वाजता उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे उपविभाग क्रमांक २  उमरखेडचे उपविभागीय अधिकारी बी एस घुगे व शाखा अभियंता सूर्यवंशी यांनी पैनगंगा नदीवरील गांजेगाव बंधाऱ्यावर येऊन पाहणी केली
यावेळी असता घुगे म्हणाले की टंचाईग्रस्त  गावांना पाणी पेनगंगा नदी पात्रातून पोहोचेपर्यंत ईसापुर धरणातून होणारा पाणी पुरवठा बंद होणार नाही गांजेगाव बंधाऱ्याचे गेट कोणी हि काडुनये आणि जर काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल  असे हि उपस्थित ग्रामस्थांना घुगे यांनी सांगितले आहे

यावेळी  अवधूतराव पाटील शिरपलीकर , राजू पाटील कोठा, साहेबराव पाटील डोलारी, साईनाथ जाधव पळसपुर, सुनील वानखेडे, कैलास जाधव , धीरज जाधव ,यांच्या  सह पैनगंगा काठावरील पळसपुर डोलारी सिरपली,कोठा ,एकंबा ,आधी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments