हिमायतनगर शहरांमध्ये दिगजमंत्र्यांची आज सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा , राजु पाटील भोयर
नागोराव शिंदे
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर. हिमायतनगर शहरातील बस स्टॅन्ड परिसरात हिंगोली मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी ६वाजता हिमायतनगर शहरांमध्ये दिग्गज मंत्र्यांची जाहीर सभा आयोजित केली असल्याचे शिंदे सेनेचे नांदेड उपजिल्हाप्रमुख राजू पाटील भोयर यांनी आमच्या प्रतिनिधीशि बोलतांना सांगितले आहे
या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा अशोकराव चव्हाण , विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई , गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई , माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील, आशाताई पाडवि विधानपरिषदेच्या आमदार,यांचि आज हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार बाबुरावजी कदम यांच्या प्रचारार्थ हिमायतनगर येथे जाहीर सभेचे आयोजन आज सायंकाळी सहा वाजता आयोजित केली आहे या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिंदे सेनेचै विजयकुमार वळसे पाटील यांनी सांगितले आहे

0 Comments