महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या बेजबाबदार पणामुळे नायगाव तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या रुई बु येथील आरोग्य उपकेंद्र सुसज्ज असताना सुद्धा या उपकेंद्रात कोणताच कर्मचारी मुक्कामी राहात नसल्याने सदरचे आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट चित्र रुई बु येथे दिसून येत आहे
तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे गाव म्हणजे रुई बु येथे बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे रुईच्या उपकेंद्रात कोणताच कर्मचारी दिसत ही नाही आणि राहत ही नाही अशी गत अनेक महिन्या पासून निर्माण झाली असल्याने या आरोग्य उपकेंद्राला कोणी वाली आहे की नाही असा सवाल गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे
आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारमुळे वैद्यकीय अधिकारी बरबडा यांचे कोणत्याच कर्मचाऱ्यावर वचक नसल्यामुळे कर्मचारी वाऱ्यावर मोकाट फिरताना दिसून येत असले रुई बु येथील आरोग्य उपकेंद्र असताना सुद्धा एक कर्मचारी राहत नाही १५ ऑगस्ट असो २६ जानेवारी असो याच दिवशी गावात दिसत आहेत
रुईच्या आरोग्य उपकेंद्रात औषध पाणी संपूर्ण पुरवठा करून ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांना मुक्कामी राहण्याचे बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना सूचना करावी अशी मागणी गावकऱ्यानी केली आहे

0 Comments