भाजपच्या काळात गेली दहा वर्षात दलीत समाजावर मोठ्या प्रमाणात आत्याच्याराच्या घटनेत वाढत होत आहे . भाजपला सतेच्या बाहेर ठेवण्यासाठी मातंग समाजाने एकजुठीने नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना भरघोस मतांनी निवडुन द्यावे असे आवाहन अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी नायगांव येथील सभेत केले
महाविकास आघाडीचे उमेदवार नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नायगांव येथील महाराष्ट्र मंगल कार्यालयात नांदेड जिल्हयातील मातंग समाजाची प्रचड मोठी सभा २३ एप्रिल रोजी पार पडली त्या वेळी ते बोलत होते
यावेळी उमेदवार वसंतराव चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, रा. ना.मेटकर, शंकरराव गायकवाड, कीशोर कवडीकर,निळकंठ ताकबीडकर , संजय बोथीकर, द्रोपताताई कांबळे, मालोजी वाघमारे, सरपंच दत्ता आईलवार, नामदेव सोनकांबळे. आकाश सोनटक्के, परमेश्वर वाघमारे, जयसिंग कांबळे, शिवाजी बोयनर, आक्षय बोयाळ, दिगांबर झुंजारे, आदी उपस्थित होते.
यावेळी विशेष कार्यक्रम
समता क्रांती गायाण पार्टी पार्टी कृष्णूर प्रमुख कामाजी वाघमारे हार्मोनियम मास्टर व गायक सुरेश कागडे साहेबराव लांडगे, महिला गायक सुरेखाताई पाटील चंद्रपूर / नागपूर , कवी गायक गंगाधर वाघमारे बॅजीव वादक प्रवीण कांबळे कापसीकर ढोल प्रशांत सोनकांबळे येताळा यांच्या यावेळी कार्यक्रम घेण्यात आला आहे
पुढे बोलताना साठे म्हणाले देशात लोकशाही शिलक राहीली नाही.हुकमशाही च्या दिशेन वाटचाल चालु आहे. या वेळेस सतेत भाजप आले तर पुडच्या निवडनुका होतील की नाही या बाबद मला शंका वाटते म्हणून सविधान सुरक्षित ठेवण्यासाठी आपण जागृत राहुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडुन देण्याच काम समाजानी एकजुठीने केले पाहीजे असे शेवठी सचिन साठे म्हणाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण म्हणाले पक्षाने भरभरून दिल तरी काही जन शेवठी पक्ष सोडून कमळाच्या फुलावर बसले मी मात्र काॅग्रेस सोबत एकनिष्ठ आणि खंबीरपणे तुमच्या ताकतीवर लढत आहे
मला विश्वास आहे नांदेड जिल्हयातील मातंग समाज माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. साठे कुंठूबावर प्रेम करणारे महाराष्ट्र खुप मोठा समाज आसुन ते काॅग्रेस सोबत प्रमाणिक पणे राहीलेले आहेत असे शेवठी चव्हाण यांनी म्हणाले.
ही सभा यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे क्रांती सेना नांदेड च्या पदाधिका-यानी परिश्रम घेतले आहेत.

0 Comments