नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथे अचानक वादळी वारे सुटल्यामुळे एक लिंबाचे मोठे झाड कोसळून टीना पत्रावर पडल्यामुळे सदरच्या पत्राची नासधूस झाली असली तरी काही अनुचित प्रकार घडला नसल्याचे ऑनलाईन वर्त असून सदरचा प्रकार हा दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे
तालुक्यातील रुई बु येथे आकाशात बदल व उन्हाचा तडका आणि त्यातच वादळी वारे मोठया प्रमाणात सुटल्यामुळे एका टीना पत्राच्या घरावर पडले असले तरी काही प्रमाणात टीना पत्रे वाकून गेले असून सदरच्या वादळी वाऱ्याचा प्रकार अधून मधून तीन ते साडे तीन पासून चालू आहे
ग्रामीण भागात गेल्या चार ते पाच दिवसापासून वातावरणात बिघाड असल्यामुळे व कडाक्याचा उन्हाळा असल्याने मानवासह जनसामान्य माणसा बरोबर जनावरे पशुपक्षी यांच्या अंगाची लाही लाही होतानाचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
रुई बु परिसरात दुपार पासूनच कमालीची गर्मी वाढली होती आकाशात विजेचा कडकडाट ही झाला वीज चमकु लागल्या होत्या पाऊसाचे थेंब तुरळक आले होते परंतु पाऊस पडला नसला तरी वादळी वाऱ्यामुळे लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

0 Comments