Header Ads Widget

इज्जतगावच्या शेतकऱ्याची ८० हजाराची संकरित गाय सादकपूर येथे विज पडून ठार - शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील शेतकरी माधव आनंदराव डोईफोडे या गरीब शेतकऱ्याच्या संकरित गाईवर दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान लिंबाच्या झाडाजवळ बांधण्यात आलेल्या गाईवर विज पडून ८० हाजार रुपयाची गाय ठार झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील शेतकरी माधव आनंदराव डोईफोडे यांचे शेत गट क्रमांक ६९ या शेतात म्हणजे सादकपूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे गाय शेतारील लिंबाच्या झाडाच्या सावलीत बांधली होती परंतु अचानक वादळी वाऱ्या बरोबर पाऊस व विजेचा कडकडाट चालू झाला त्यात झाडाखाली बांधण्यात आलेल्या गाईवर वीज पडून गाय जागीच ठार झाली आहे

मौजे इज्जतगाव येथील शेतकऱ्यांची संकरित गाय वीज पडून ठार झाले असल्यामुळे नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांनी आपल्या प्रशासनाच्या मार्फत मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना देऊन तात्काळ पंचनामा करून गरीब शेतकर्यांना अनुदान मिळून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे 


Post a Comment

0 Comments