Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्राला तिसरा कालवा घोषित करण्याची नागोराव शिंदेची मागणी -


       नागोराव शिंदे

हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्राला तिसरा कालवा घोषित करून बारमाही पाणी सोडण्याचे नियोजन करा अशा आशयाचे  निवेदन आज हादगाव येथे हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार बाबुरावजी कदम कोहळिकर यांच्या प्रचारार्थ आले

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे सविस्तर असे की हिंगोली जिल्ह्यांमध्ये ईसापुर धरण असून या ईसापुर धरणातून उजव्या कालव्याने पाणी धर्माबाद पर्यंत जाते आणि डाव्या कालव्याने सिंचनासाठी सोडल्या जाते

हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील २५ गावांना ईसापुर धरणाच्या पाण्याचा एकही रुपयाचा फायदा नाही फायदा तर सोडा परंतु पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकावर पाणीटंचाईची सावट आले असल्याने पेनगंगा नदी पात्राला तिसरा

कालवा घोषित करून बारमाही पाणी सोडण्याचे नियोजन करावे आणि ईसापुर धरणातून व्यतिरिक्त पाणीसाठा हा जून जुलै ऑगस्ट मध्ये पैनगंगा नदी पात्रात सोडून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत

त्याचे नियोजन करणे बाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे निवेदनावर नागोराव शिंदे पळसपुरकर, संतोष पाटील कदम डोलारीकर , विनायकराव सूर्यवंशी शेषराव देवसरकर पळसपुरकर ,दत्ता बोंबिलवार, सदाशिव वानखेडे ,संदीप सूर्यवंशी, आनंदराव जाधव ,प्रकाश जाधव ,यांच्यासह शेकडो नदीकाठच्या ग्रामस्थांच्या सहयानिशी आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments