Header Ads Widget

पोलीस पाटील रमण रावते यांचा सत्कार

         नागोराव शिंदे

हिमायतनगर ढाणकी येथील पोलीस पाटील रमण रावते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त येथील पोलीस चौकी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, बिटरगाव पोलीस स्टेशन व पोलीस पाटील संघटनेच्या वतीने रमण रावते यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील रमण रावते हे ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेक वर्ष पोलीस पाटील संघटनेचे उमरखेड तालुकाध्यक्ष म्हणून पद भूषविले आहे. रमण पाटील रावते यांना महाराष्ट्र पोलीस यवतमाळ जिल्हा पोलीस दल पुरस्कार तसेच स.न. २०११ रोजी राज्यपाल पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा शौर्य पुरस्कार महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करून राज्यपाल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेम केदार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूरने, उमरखेड तालुका पोलीस पाटील संघटनेचे सुनील पाटील देवसरकर यांच्या सह सर्व सदस्य, बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments