नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हाचे खासदार तथा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नरसी येथील जाहीर सभेला यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलंवडे यांच्यासह अन्य राजकीय पुढाऱ्याना विशेष प्रयत्न करावे लागले आहे
लोकसभेच्या निवडणूना दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचार सभेच्या कार्यक्रमाचा वेग वाढला असून नायागांव तालुक्यातील नरसी येथील जाहीर सभेसाठी देशाचे ग्रहमंत्री अमितशहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती सदरचा कार्यक्रम प्रामाणिक पणे यशस्वी करण्यासाठी भाजपाच्या पुढाऱ्याना मोठा पुढाकार घ्यावा लागला आहे
भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्यासह इतर राजकीय ग्रामीण पुढाऱ्यानी सदरच्या जाहीर सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्यासाठी शोशियल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते सदरच्या जाहीर सभेला भारतीय जनता पार्टीचे मंत्री संत्री आले होते आणि नांदेड लोकसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने सदरची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती

0 Comments