Header Ads Widget

नांदेड लोकसभा मतदार संघात मतदारानी लोकशाही पद्धतीने मतदान करून लोकशाहीचा उत्सव केला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह पोलीस अधीक्षक यांनी यंत्रणा सज्ज ठेवली !!

                 माधव पवार
नांदेड लोकसभा मतदार संघाची निवडणूक कवचित एका ठिकाणी झालेला अनुचित प्रकार वगळता सर्वत्र शांततेत पार पडले असून नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह त्यांची प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे मतदान केंद्रा वरील प्रक्रिया छान पैकी हाताळल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे

नांदेड जिल्ह्याचे प्रोग्राम विचाराचे व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नेतृत्वाखाली या लोकसभा मतदार संघातील उपविभागीय अधिकाऱ्यासह संबंधित तहसीलदार यांचे ह्या लोकसभा निवडणुकी मध्ये मोठे योगदान असल्याने जिल्ह्यातील मतदान अतिशय शांततेत पार पडले असल्याचे व्रत आहे

जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व निवडणुकीची यंत्रणा सज्ज ठेवून लोकसभेचे मतदान शांततेत पार पाडले सर्व मतदान केंद्रावर पोलिस यंत्रणा दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाला राऊंड मारल्याने मतदान केंद्रावर सर्व खेळी मेळीच्या वातावरणात लोकशाहीच्या उत्साहात लोकशाही पद्धतीने मतदार मतदान केले आहे

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर आलेल्या अधिकाऱ्याने सुद्धा चांगल्या प्रकारे शासनाच्या अटी व नियम व आचारसंहितेचे पालन करून शांततेत मतदान करून घेतल्याचे व्रत असून दिनांक २६ एप्रिल २०२४ शांततेत लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे


Post a Comment

0 Comments