नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी खेड्या पाड्यात मतदान पेट्यासह पोलीस व निवडणुक कर्मचारी दाखल झाल्या असून सदर दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी होत असल्यामुळे मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठया प्रमाणात खबरदारी प्रशासनानी घेतली आहे
लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचार तोफा दिनांक २४ एप्रिल २०२४ थंडावल्या आहेत तर दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी सदरच्या निवडणुकीच्या मत पेट्या व कर्मचारी व पोलीस कर्मचारी गावा गावात दाखल झाले आहेत तर मतदान दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी चालू होणार असल्यामुळे प्रशासन मोठी काळजी घेतली आहे
सदरच्या निवडणुकीसाठी मतदार बांधव ही मतदान करण्यासाठी सज्ज झाले असून प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्राणा लावून सज्ज झाले आहेत मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस प्रमुखांनी चांगलाच चौख बंदोबस्त लावला असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे
नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी खेड्या पाड्यात मतदान पेट्यासह पोलीस व निवडणुक कर्मचारी दाखल झाल्या आहेत

0 Comments