Header Ads Widget

लोहा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील चार इसमाना हद्दपारचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे गोसावी यांनी केले हद्दपार !!

         माधव पवार
आगामी दिनांक  १४ एप्रिल / २०२४  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमी हे सण उत्सव असल्याने काही समाजकंटकांकडून कोणत्याही प्रकारचा दखलपात्र गुन्हा घडू नये तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये 
सण उत्सव शांततेत पार पडावे सामाजिक सलोखा टिकून राहावा

तसेच वरील इसमानवर वारंवार प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली नसल्यामुळे पोलीस स्टेशन लोहा हद्दीतील एक विजय मुंजाजी होळगे राहणार खडक मांजरी २ राजू नागोराव अंबुर्डे राहणार इंदिरानगर, लोहा 3. दीपक भाऊराव जोंधळे राहणार पानभोशी तालुका कंधार 4. किशोर एकनाथ भोळे राहणार आंबेडकर नगर  लोहा

५ विजय मुंजाजी होळगे राहणार खडक मांजरी तालुका लोहा यांच्यावर पोलीस स्टेशन लोहा यांच्याकडून प्रतिबंध कारवाही म्हणून तसेच दोन्हीही सण उत्सवामध्ये शांतता राहावी म्हणून कलम १४४ ( २ ) सीआरपीसी अन्वये  पोलीस स्टेशन लोहा तर्फे वरील इसमांना हद्दपार करावे म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
 
माननीय एस डी पी ओ उपविभाग कंधार श्री गोसावी यांनी वर नमूद व्यक्तींवर दिनांक १४ एप्रिल २०२४ तसेच दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी गावातून हद्दपार होणे बाबत आदेश पारित केलेले आहेत. संबंधित दोन दिवशी जर वरील इसम गावात मिळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून पोलीस स्टेशनकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments