Header Ads Widget

मराठा आरक्षणाची धग आणि राजकीय पुढार्‍याची पाजगत लोकसभा निवडणूक काट्यावर होणार !!

         माधव पवार
राज्यात निवडणूक विभागाने लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या असल्यामुळे महायुतीचे उमेदवार असो की महाविकास आघाडीचे उमेदवार असो त्या उमेदवारासह राजकीय पुढार्‍यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत असून अशा अनेक ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारा दरम्यान सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यातून गुफान विरोध होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे व दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका असल्याने राजकीय पुढार्‍यांना व नेते मंडळींना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाऊन सदरच्या समाजाचा रोष पत्करावा लागत असल्याचे चित्र अधून मधून पाहावयास मिळत असून सदरच्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणाची धग अजून ही ग्रामीण भागात कायमच आहे

या राज्यातील राजकीय नेते मंडळी व राजकीय पुढारी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा स्पष्टपणे मार्गी लावला असता तर मराठा समाज हा एवढ्या मोठ्या संख्येने राजकीय पुढार्‍यावर आक्रमक झाला नसता कारण सरकार हे तू कर मारल्यावाणी आणि मी करतो रडल्यावानी अशा पद्धतीची भूमिका या राज्यातील राजकीय नेते मंडळींनी घेतली असल्याने मराठा समाज अधिकचा आक्रमण झाला आहे

जनता जनार्दनाच्या आवाजाने दिलीचा दरबार व तक्ता हलतो तर या राज्यातील राजकीय पुढारी व नेते मंडळी कोणते सूत्र हलव्याच्या तैरीत नसल्यामुळे भर लोकसभेच्या निवडणूक काळात सदरच्या नेते मंडळींना वटणीवर आणण्यासाठी सदरच्या पुढार्‍यांना गावात सकल मराठा समाज कसल्याच प्रकारचा थारा देत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असली तरी सदरच्या पुढाऱ्यांना काटे वरची कसरत करावी लागणार आहे 




Post a Comment

0 Comments