Header Ads Widget

बिलोली येथे कार्यरत असताना सपोनि केंद्रे यांनी ३०२ गुन्ह्याचा तपास कसून करून आरोपीला जन्म ठेपे पर्यत पोहाचला - लोहा येथील पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार !!

                माधव पवार
बिलोली येथे कार्यरत असताना सपोनि केंद्रे यांनी ३०२ गुन्ह्याचा तपास कसून करून आरोपीला जन्म ठेपे पर्यत पोहाचला - लोहा येथील पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करून त्यांच्या भावी कार्यासाठी प्रोरोत्सान मिळवून दिले आहे
सदरील घटनेची थोडक्यात माहिती अशी की दिनांक ५ ऑक्टोबर २०१९ सदर गुन्ह्यात फिर्यादी व तिचा पती राहत्या घरी कासराळी तालुका बिलोली येथे असताना मयत लक्ष्मण इबितवार यांचा भाऊ / आरोपी व त्यांची पत्नी यांनी फिर्यादी व तिच्या पतीला उद्देशून शिवीगाळ करत असताना यांना समजावून सांगण्या करिता पिराबाई व तिचा पती गेले  होते

त्यांच्या सोबत भांडण करून हनमंत याने त्यांच्या घरातील लोखंडी कुस्सा / सबल घेऊन फिर्यादीचा पती मयत लक्ष्मण ईबीतवार यांच्या डोक्यात मारल्याने मयत यास जब्बर दुखापत झाली व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता

सदरील घटने विषयी दिनांक ६ ऑक्टोंबर २०१९ रोजी मयतांची पत्नी हिराबाई लक्ष्मण इबितवार हिच्या फिर्यादीवरून वरील आरोपी गुन्हा क्रमांक २८८ कलम ३०२,३२४,५०४ ३४ भादवी आन्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पूर्ण तपास करून दोषा आरोप पत्र माननीय अतिरिक्त न्यायालय बिलोली येथे दाखल केले होते

Post a Comment

0 Comments