Header Ads Widget

महाविकास आघाडीच्या उमेदवारासह महायुवतीच्या उमेदवाराकडे मतदाराचे लक्ष निवडणूक होणार अटीतटीची -

         माधव पवार
नांदेड लोकसभा मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण तर महायुवतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर या तगड्या पैलवानाकडे मतदाराचे लक्ष आहे

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात दोन्ही पैलवाणाची कुस्ती रंगदार होणार असल्याचे सदरच्या मतदारातुन बोलल्या जात आहे

नांदेड लोकसभा मतदार संघात भाजप पक्ष आणि काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणात चर्चा असल्यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप चिखलीकर यांच्या विजयासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहेत

तर महाविकास आघाडीचे उमेदवार नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी वसंतराव चव्हाण यांच्या विजयासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत

१६ नांदेड लोकसभा मतदार संघात आपापल्या पक्षाचे उमेदवार विजयी करून घेण्यासाठी कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत असल्याने एकीकडे भाजपा पक्षाचे मेळावे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ मोठाले मिळावे घेतले जात आहे 

महाविकास आघाडीच्या उमेदवारासह महायुवतीच्या उमेदवाराकडे मतदाराचे लक्ष  निवडणूक होणार अटीतटीची होणार असल्याचे आज पासून स्पष्ट दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments