Header Ads Widget

जग दाखविणाऱ्या जन्म दात्या आईलाच स्वतःच्या मुलाने संपविले तालुक्यातील मौजे पोटा बु.येथील घटना - पोलीस यंत्रणा तपासात जूटली


हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिमायतनगर  तालुक्यातील मौजे पोटा बु येथे दिनांक १० मार्च २०२४ रोजीच्या सायंकाळी मुलगा आरोपी सचिन उर्फ गजानन दत्ता जळपते यांनी त्यांच्या अख जग दाखविणाऱ्या जन्म दात्या आईचा घरगुती कारणामुळे सदरील प्रकाश माने यांच्या शेतामध्ये दगडाने ठेचून खून केल्याची संताप जनक घटना उघड किस आली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आह

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथे दिनांक १० मार्च २०२४ च्या सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान  मयत अनिता दत्ता जळपते ही महिला प्रकाश माने यांच्या शेतात काम करत असताना त्यांच्याच स्वतःच्या मुलाने सचिन उर्फ गजानन दत्ता जळपते यांनी घरगुती कारणामुळे दगडानी ठेचून खून केला असल्यामुळे या भागात संताप व्यक्त केला जात आहे

सदरची घटना कळताचा खळबळ उडाली ही बातमी समजताच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी हिमायतनगर पोलिसांना ह्याची माहिती दिली हिमायतनगर पोलिसांनी फिर्यादी मारोती संभाजी चित्तलवाड रा. वारंगटाकली मयत महिलेचा भाऊ यांनी ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदे हे करीत आहेत


Post a Comment

0 Comments