हिमायतनगर तालुक्यातील वृद्ध कलाकारांना पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे की वृद्ध कलाकारांना बँकेतून मानधन मिळते असल्याने त्या साठी महत्वाची सूचना आहे की आपल्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड जोडणे आवश्यक असल्याने तात्काळ आपण आपले बँक खात्याची आधार आणि मोबाईल लिंक करून घेऊन आपले मानधन जमा होण्यासाठी सहकार्य करावे अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस एन मांजरमकर , यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभाग पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक शिवाजी पांचाळ यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले आहे ,
आणि तसेच तालुक्यातील मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी हिमायतनगर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागामार्फत निवड झालेल्या विस टक्के सेस योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लागणारे आवश्यक ते कागदपत्रे हिमायतनगर येथील समाज कल्याण विभागांमध्ये आपण लवकर जमा करावे असे सुद्धा सांगण्यात आले आहे निवड लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये लावण्यात आली असल्याचे शिवाजी पांचाळ यांनी सांगितले आहे

0 Comments