Header Ads Widget

काँग्रेस आणि भाजपा पक्ष एकाच माळीचे मणी असले तरी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सर्रास जनता नाराज !!

          माधव पवार
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला राज्यात फार असे यश मिळत मिळणार नाही अशी काल्पनिक भावना मनात धरून काँग्रेस पक्षाला सोड चिट्टी देऊन राजकीय प्रवास भाजपा पक्षाच्या माध्यमातून चालू केला असला तरी खासदार अशोकराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास परतत असल्याचे जन सामान्य माणसातून बोलल्या जात आहे

काँग्रेस पक्ष व भाजपा पक्ष एकाच माळीचे म्हणणे असले तरी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हासह ग्रामीण भागातील जनसामान्य माणूस सर्रास नाराज असल्याचे स्पष्ट चित्र जागोजागी ऐकवयास व पाहवयास मिळत  आहे

राज्यातले राज्य सरकार सकल मराठा समाजाला आरक्षण दिले नसल्यामुळे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो तर दुसऱ्या बाजूने खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला असल्याने त्यांचे पूर्वीचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहे

लोकसभेच्या निवडणुकी मध्ये राज्यातील राजकीय पुढार्‍यांना लोकशाही मार्गाने मतदान मागण्याचा अधिकार असल्यामुळे जनतेच्या दरबारात पदर पसरावे लागणार आहे

सदरच्या राजकीय नेते मंडळी सह पुढाऱ्यांना गेल्या पाच वर्षात जनतेसाठी काय व कोणते उपकार केले हे त्यांना सांगावे लागणार आहे  



Post a Comment

0 Comments