महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ज्या नेते मंडळीची चर्चा होते असे महाविकास आघाडीचे व नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यात व महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची नांदेड लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात रंगदार सामना रंगणार आहे
या मतदार संघातील मतदार बांधव लोकशाही पद्धतीने व निर्भीडपणे मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावणार आहेत
नांदेड लोकसभा मतदार संघातील मतदार सुज्ञान असल्यामुळे कोणत्या ही राजकीय पक्षाच्या भूलथापाला बळी पडणार नाहीत या निवडणुकीतील उमेदवार कोणी असो ज्याची भूमिका विकासात्मक आहे अशा उमेदवाराच्या पाठी मागे जनता जनार्दन ठाम पणे उभी राहणार असल्याचे जागो जागी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानांच्या माध्यमातून गोरगरीब असो की श्रीमंत असो त्यांना एका मताचा अधिकार दिला आहे
डॉ बाबासाहेबानी लोकशाही मिळवून दिल्याने लोकशाही पद्धतीने मतदान करून आपलं अमूल्य मताच्या माध्यमातून मतदान करणार असल्याचे मतदारानी सांगितले आहे
या लोकसभेच्या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या निवडणुकीत होणारा देशी दारूचा महापूर कायमचा बंद करावा असे ही सदरच्या मतदारातून बोलल्या जात आहे

0 Comments