Header Ads Widget

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून शेतकरी राजाना व तरुणांना मिळते आर्थिक संजीवनी !!

        माधव पवार
शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या कर्तृत्वातून  शेतकऱ्यांना व नाव तरुण वर्गांना व्यवसायाच्या माध्यमातून एक प्रकारची आर्थिक संजीवनी मिळत असल्यामुळे आर्थिक चंचन दूर होत असल्याचे सांगण्यात येते व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळे अनेक जण व्यवसायाकडे वळले असल्याची  स्पष्ट चित्र आहे

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी या गावात सुसंस्कृत शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर शिक्षणाची कास धरून शिक्षकी पेशा आपण स्वीकारला. ग्रामीण भागातील युवकांना रोजगारासाठी पतपुरवठा होणे सुकर व्हावे यासाठी व्हिपिके उद्योग समुहाअंतर्गत क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नव संजीवनी ठरणारे कृषीपुरक व्यवसाय सुरू केले. गुळपावडर, साखर,दुध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीचा भाव मिळावे हा उद्देश ठेवून इथेनॉल प्रकल्प निर्मिती उभारणीचे विढा उचला, इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यासह आपण आपल्या  परिसरातील शेतकरी कुटुंबात आर्थिक क्रांती करण्याचे राष्ट्रहितेषी कार्य करत आहेत

नांदेड जिल्ह्याच्या परिवर्तनवादी व वैज्ञानिक सामाजिक चळवळीना बळ दिले. आधुनिक विचारांची कास धरत प्रबोधनाच्या माध्यमातून तरुणांची फळी उभी केली. आपल्या अलौकिक कार्यामुळे कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेतकरी व शेतमजूरांना नवी उमेद मिळाली आहे. अर्थपुरवठा व कृषीपुरक उद्योगाच्या माध्यमातून आपण करत असलेल्या मौलिक कार्यास सर्व बळ प्राप्त होत आहे


Post a Comment

0 Comments