Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्यात रुई खुर्द येथील सुवर्णाच्या ३ जनावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत यांच्या कडून तपास जारी !!

                 माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रुई खुर्द येथे दिनांक १० मार्च २०२४ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी सुवर्णाच्या काही मंडळीनी लोखंडीला भगवा झेंडा बांधण्यासाठी गेले आहे 
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील फिर्यादी साहेब पांडुरंग पवार यांच्या तक्रारी वरून आरोपी श्याम चपंतराव बेलकर कृष्णा सुधाकर जाधव विलास मोरे या पैकी एक जन बाहेर गावचा असल्याचे सांगण्यात येत असले तरी कुंटूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रुई खुर्द येथील साठे नगर चौका मध्ये असलेल्या लोखंडी खांबावर त्याच ठिकाणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ही निळा झेंडा होता तो झेंडा काडून भगवा लावल्याच्या कारणा वरून झालेल्या बाचा बाचित जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली असल्याने सुवर्णाच्या तिघा जनावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे

धर्माबाद ते उपविभागीय पोलीस अधिकारी संपत यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी रुई खुर्द येथे गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थिती मध्ये शांतता कमिटीची बैठक घेऊन दोन्ही समाजात होणारा ताण तणाव हा शांत राहण्यासाठी व सुख समाधाना राहण्यासाठी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आहे

सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार खोले फौजदार सोनुले बिट जमादार आर टी पवार पो का अशोकराव घुमे व पो. का.बा-हाळे हे घटना स्थळी आहेत 



Post a Comment

0 Comments