देशाच्या विकासासाठी आणी विकसीत भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आणी महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीजास्त खासदार निवडून आणायचे आहेत त्या माध्यमातून देशात भाजपा प्रणित एनडीएचे अबकी बार ४०० पार हा संकल्प पूर्ण होणार आहे
असा विश्वास माजी मुख्यमंञी खा.अशोकराव चव्हाण यांनी वाघलवाडा येथील उमरी,धर्माबाद, नायगाव आधी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यक्रत्य भाजप पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलतांना व्यक्त केले आहे
शेतकरी नेते तथा उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांनी मुबंई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणी माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित नुकताच भाजपात पक्ष प्रवेश केला आहे
कवळे गुरूजी यांचे समर्थक आणी कार्यक्रत्यांनी ता.२० मार्च रोजी उमरी तालुक्यातील वाघलवाडा येथील डाॅ.शंकरराव चव्हाण कारखाना येथे भाजपात प्रवेश केला.यावेळी माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण साहेब यांच्यासह खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, विधानपरिषदेचे माजी गटनेता अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, यांची प्रमुख उपस्थित होती
भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेते पदधिका-यात उमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, माजी सभापती बाबु नाईक राठोड,प्रभाकरराव पुयेड, गणेशराव पाटील ढोलउमरीकर,संदिप पाटील कवळे,परमेश्वर पाटिल कवळे,संतोष सरसे,साईनाथ वाघे,मारोती उमाटे,पंजाबराव पाटील कार्लेकर, आनंदराव पाटील भायेगावकर, मधुकरराव पाटील बोळसेकर ,वाघमारे,संतोष सावंत, श्रीराम पाटील जगदंबे, नागनाथ पाटील, विलास नरवाडे,पाडुरंग पाटील वाघलवाडेकर, व्यंकटराव पाटील सावंत, सुरेश देशमुख तळेगावकर आदी उपस्थित होते
किशन राठोड, सोनु वाघमारे,उत्तम आयेवार, राजेश वर्मा,शेख मुस्सा,साईनाथ मुटकूटवार, पंडित बेंबरे, प्रणिता जोशी,भारतबाई दुधंबे,अग्रवाल ताई, देविदास पहेलवान, भुजंगराव पाटील,बाबुराव कोल्हेकर, एकनाथ पाटील शेलगावकर,संभाजी सावंत,हरी चव्हाण,दत्ताहरी पाटील शिंगणापूरकर, यांच्यासह उमरी,धर्माबाद व नायगाव आधी तालुक्यातील संरपच,उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हायचेअरमन, सदस्य, तंटामुक्ती आजी माजी अध्यक्ष, कार्यक्रत्य ठेकेदार यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला.
खा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले, की या भागातील चव्हाण घराण्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. मारोतराव कवळे यांच्या रुपातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपात येत आहेत. पूर्वीचे कट्टर शिवसैनिक संजय कुलकर्णी हेही आज भाजपात आले आहेत. या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून महायुतीचे जास्तीतजास्त खासदार निवडून आणायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमूख नेतृत्वामुळे आपण भाजपात प्रवेश केला.
श्रीराम मंदिराचा प्रश्न मोदी यांनी सोडवला. देशभरातील तीर्थक्षेत्र विकास, विमानतळे, महामार्ग, रेल्वे, सिंचन असे अनेक महत्वाचे निर्णय मोदी यांच्या यशस्वी आणि सक्षम नेतृत्वाखाली पूर्ण होत आहेत. देश आज विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर आला आहे. देशाचा आणखी विकास आणि विकसित भारत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी यावेळी भाजपा प्रणित एनडीएचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. आगामी काळात पाच खासदार नांदेड जिल्ह्याला मिळणार आहेत.
खा. बिखलीकर, आ. राजेश पवार आणि मी कधीच व्यासपीठावर आलो नव्हती. आज आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यावर विश्वास दर्शवून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात काम करण्याची संधी दिली आहे. यापूर्वी मी विधानपरिषद, विधानसभा आणि लोकसभेत काम केले आहे
राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा मी जिल्ह्याच्या विकासासाठी करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याची मला तळमळ आहे
सगेसोयरेचा अध्यादेश निघाला आहे. सहा जूननंतर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, असा विश्वासही खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. मारोतराव कवळे यांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. तुम्ही कारखाना चालवता म्हणून बाघलवाडा तुमच्याकडे दिला आहेया भागातील शेतकऱ्यांनी आता मुबलक ऊस वाढवावा. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम गुरूजी करत आहेत
आगामी काळात या भागातील बाभळी प्रश्न आणि सिंचनाचे प्रश्न सोडवू. कारखानदारी चांगली चालली पाहिजे त्यासाठी आगामी काळात कवळे गुरूजींनरा साथ देऊ, असेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यात बुलेट ट्रेन आणायची आहे. विमान सेवा सुरळीत होत आहे. नांदेड ते बासर १४०० कोटींचा सिमेंट रस्ता केला, पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आहेत
ओबीसींना न्याय दिला पाहिजे. पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर ही सर्व कामे मार्गी लागतील. त्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांना मी निवडून आणारच असेही खा. अशोकराव चव्हाण यांनी ठणकावून सांगितले. जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लाऊन खा. चिखलीकर यांना निवडून आणणार. कवळे गुरुजी उद्योगाबरोबरच राजकीय क्षेत्रातही गुरुजी आहेत.
माझ्यावर विश्वास ठेवून कवळे गुरुजी यांनी भाजपात प्रवेश केला. असा विश्वास देत येणारे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बळावर आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकवू असा विश्वासही खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले,की भाजपा हा कार्यकत्यांचा पक्ष आहे
या पक्षात कार्यकर्त्यांचा सर्वाधिक सन्मान होतो. मारोतराव कवळे गुरुजी यांना आमदार कसे करायचे त्याचा निर्णय आम्ही योग्य वेळी नक्कीच घेऊ, असे आश्वासन खा. चिखलीकर यांनी दिले. मारोतराव कवळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की मराठवाड्यात कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी जलसिंचनाची अनेक कामे केली. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना नादेडसह मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढला. त्यांच्या आदेशानुसार मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरलो. मात्र, तेव्हा काँग्रेसच्याच काही लोकांनी मला पराभूत केले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यात सत्याचे जाळे निर्माण केले.
गोदावरी नदीवरील बंधारे पूर्ण केली. अशोकराव चव्हाण जिथे तेथे आम्ही. त्यामुळे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मी कष्टाने व जनतेच्या आर्शीवादाने या भागात उद्योग उभे केले. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उद्योगांशिवाय पर्याय नाही. दरवर्षी अडीच ते तीनशे कोटी रुपये आता उसापोटी
शेतकऱ्यांच्या खिशात जातात. अनेक तरुणांच्या हाताला काम दिले, असे सांगून मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडवतील अशी आशाही व्यक्त केली. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन देताना त्यांनी आपल्या समर्थक, कार्यकत्यांना आवाहन केले. आ. राजेश पवार म्हणाले, की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केल्याने जिल्हाच नव्हे तर राज्याला फायदा होईल. कवळे गुरुजी यांच्यासारखे मोठे
उद्योजक व राजकारणी यांनी पक्षात प्रवेश करत असल्याने विकासाला चालना मिळेल. आमदार या नात्याने या भागातील सिंचन, बारुळ प्रकल्पश्न, कालवे, रस्ते, विज असे अनेक प्रश्न सोडवू प्रास्ताविकात संजय कुलकर्णी म्हणाले, की माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे नेते आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही. तसेच कवळे गुरुजी यांनी या भागात अनेक उद्योग उभारून शेतकरी, बेरोजगारांच्या हाताला काम दिले. खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आम्ही सर्वांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी राजेश देशमुख कुंटूरकर, शिवराज पाटील होटाळकर, श्रावण पाटील भिलवडे, बालाजीराव बच्चेवार, विक्रम देशमुख तळेगावकर, किशोर देशमुख, प्रविण गायकवाड, जगन शेळके, रवींद्रअण्णा पोतकटीवार, अशोकराव पाटील मुगावकर, सुधाकर देशमुख, अमोल ढगे, सुभाष पेरेवार, राजीव पाटील, गजानन श्रीरामवार, किशोर पाटील लगखुदकर, मुसळे, मारोतराव शंखतीर्थकर, संदीप पाटील कवळे,परमेश्वर पाटिल कवळे आधीची उपस्थित होते.

0 Comments