नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बळेगाव येथील रहिवासी देविदास भिवजी पाटील बेलकर यांचा मुलगा मयत भिवजी देविदास बेलकर वय अंदाजे २४ वर्ष राहणार बळेगाव यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे दिनांक २१ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ८ ते सव्वा ८ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार आर टी पवार,पो.कॉ अशोकराव घुमे, पो कॉ बा-हाळे यांच्यासह यांनी घटना स्थळी घटनेची पाहणी केली व पंचनामा केला आहे
येथील पंडित गणपतराव पाटील बेलकर यांच्या विहिरीत गट क्रमांक ३४४ एक विहिर असून या विहिरीत अंदाजे २५ फूट पाण्यात उडी मारून आत्महत्या केली आहे
राज्यात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे नायगाव तालुक्यातील बळेगाव येथील एक २४ वर्षीय तरुण गावा लागत असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व देत नसल्याने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा करीत आत्महत्या केली आहे
व गावकऱ्यानी सदरची घोषणा एकूण विहिरी कडे धाव घेत असताना सदरचा मराठा तरुण विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे

0 Comments