Header Ads Widget

सन २०१४ मधील तळेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक काळात एकमेकाचे विरोधक असलेले मारोतराव कवळे गुरुजी व माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यात दिल खुलास बातचीत !!

          माधव पवार
नांदेड जिल्हाच्या उमरी तालुक्यात सन २०१४ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी दिवंगत आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या राष्ट्रवादी पक्षा कडून शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी तळेगाव जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढवली होती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कवळे गुरुजी यांच्या 
प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी निवडणूक लढविली होती

तळेगाव जिल्हा परिषद गटातील एकेकाचे विरोधक असलेले राजकीय हे तगडे पुढारी नायगाव येथील स्व. बालाजी माधवराव पाटील वडजे यांच्या अंत्यविधीला आले होते

त्या नंतर भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या कार्यालयात भेट झाल्याच्या नंतर शेतकरी नेते तथा भारतीय जनता पार्टीचे कवळे गुरुजी यांच्यात दिल खुलास बातचित झाली आहे

राजकीय क्षेत्रात वावरत असताना वैचारिक राजकीय विरोध असतो परंतु मैत्री कधी तुटत नसते नाही नेते एकाच पक्षाचे असल्यामुळे वैचारिक रित्या बातचीत झाल्याचे समजते एकेकाळी शिक्षण सभापती विरुद्ध एक शिक्षक अशी तळेगाव जिल्हा परिषद गटात निवडणूक झाली होती मित्रत्व हे कायम ठेवण्यासाठी निकटचे प्रेम असावे लागते

तर राजकारणा मध्ये तात्पुरत्या स्वरूपात झलक दाखविण्यासाठी राजकीय पुढार्‍यांना पवित्रा घ्यावा लागतो अशी एकेकाळातील विरोधक जोडी नायगाव येथे एकत्र पणे दिलखुश बातचीत करताना दिसून आली या सदरच्या भेटी मधून हम सब एक है असे दिसून आले

सन २०१४ मधील तळेगाव जिल्हा परिषद  गटात एकमेकाचे विरोधक असलेले मारोतराव कवळे गुरुजी व माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचा दिल खुलास बातचीत झाली असल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

Post a Comment

0 Comments