Header Ads Widget

ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता वाढली पाण्याची ही टंचाई होणार ?

           माधव पवार
गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहिले तर यंदा मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे पशु पक्षासह जनसामान्य माणसासह छोट्या छोट्या बालकांना मोठ्या प्रमाणात गर्मी होत असल्याने सध्याच्या परिस्थिती मध्ये कमालीची चर्चा होना ऐकावयास मिळत आहे

यात ग्रामीण भागात गेल्या वर्षी मार्च महिन्या मध्ये एवढी उन्हाची तीव्रता वाढली नव्हती परंतु यंदा मात्र मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे लोकांना झाडाच्या सावली खाली जाऊन बसावे लागत आहे

यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाले असले तरी या परिसरातील पाझर तलावातील पाणी पूर्ण पणे कमी होऊन गेले असून शेतकऱ्यांच्या जनावराना येत्या जून महिन्यात तळ्यात पाणी राहील की नाही अशी शंका वाटत आहे

जना वराना व रानटी जनावरांना पाणी मिळेल की नाही असा प्रश्न तळ्यातील पाण्यावरून दिसून येत आहे

सध्याच्या परिस्थिती मध्ये जनावराना सुद्धा पाणी पाजवण्यासाठी तळ्यावर घेऊन यावे लागते व तळ्यात थोडेफार पाणी असले तरी येत्या जून महिन्या पर्यंत पाण्याचा एक ही थेंब दिसणार नाही अशी परिस्थिती सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments