Header Ads Widget

सक्षम आशा सेविकेच्या निवडीसाठी विजय वाठोरे ११ मार्च रोजी आमरण उपोषणाला बसणार

हिमायतनगर : नागोराव शिंदे - 
हिमायतनगर तालुक्यातिल मौजे सरसम बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत इंदिरानगर येथील आशा सेविका भरतीत गैरव्यवहार झाला असून निवड केलेल्या उमेदवारास बोगस अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे निवड करण्यात आली आहे

गैरव्यवहार झाल्यामुळे युवा ग्रामीण पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष विजय वाठोरे हे न्यायासाठी दि ११ मार्च रोजी आमरण उपोषण करणार आहेत

याविषयी सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम अंतर्गत इंदिरानगर येथील आशा सेविका भरती प्रक्रियत अनेकदा लेखी व तोंडी निवेदन देऊन ही अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला.या भरती मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची शंका नसून पूर्ण विश्वास आहे

या विषयी विजय वाठोरे यांनी दि २७ जानेवारी रोजी ही प्रक्रिया पारदर्शी करावी यासाठी निवेदन दिले होते. याचा कवडी चाही विचार करण्यात  आला नाही कारण या भरती प्रक्रियेसाठी सक्षम उमेदवार असतानाही आशा सेविका पदासाठी गुणानुक्रमे असक्षम उमेदवारांना राजकीय दबावाखाली व गैरव्यवहार करून मार्क वाढवून त्यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे

सदरील प्रक्रिया ग्रामपंचायत च्या हातात असताना तिथे राजकीय पुढारी दबाव निर्माण  करत होते म्हणून तिथला कार्यकाळ संपल्यामुळे ही प्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथील अधिकाऱ्यांकडे अर्ज वर्ग करण्यात आले. येथून ही राजकीय दबाव व गैरव्यवहार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असल्याचे सांगितले जाते.

  दि ५ मार्च रोजी याविषयीचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे यांना दिले होते. याचा अजून कोणताही  विचार करण्यात आला नाही व लेखी प्रतिक्रियेत कोणतेही समाधान न झाल्यामुळे ११ मार्च रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे विजय वाठोरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

गुणानुक्रमाणे वर करण्यात आलेल्या दोन्ही उमेदवारांचे कागदपत्र व अनुभव प्रमाणपत्रे बोगस असतानाही,सक्षम नसतानाही निवड करणाऱ्या अधिकाऱ्याने त्यांनां मार्क वाढून टाकलेले आहेत.या बाबत विजय वाठोरे यांना आक्षेप आहे सदरील भरती ही नियमबाह्य होत आहे. शासनाच्या नियमांना फाटा मारत आपलीच मनमानी  अधिकारी व राजकीय पुढारी करत आहेत

यासाठी ही भरती रद्द करण्यात यावी गैरव्यवहार करून गुण वाढून टाकलेल्या दोन्ही उमेदवारांचे अनुभव प्रमाणपत्र बोगस असून निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला पाच वर्ष अनुभवाचे पाच गुण अवैद्य रित्या देण्यात आले आहेत.निवड केलेला उमेदवार दिव्यांग आहे आणि आशासेविका चे काम सतत हिंडते फिरते आहे. त्यामुळे त्या पदासाठी सक्षम नाही तरीही राजकीय दबावाने व गैरव्यवहाराने निवड करण्यात आली आहे.तसेच तो उमेदवार अविवाहीत आहे

दोन क्रमांकाच्या उमेदवाराला दोन वर्ष अनुभव असताना चार गुण देण्यात आले आहेत हे शासकीय रित्या नियम बाह्या आहे व अनुभव प्रमाणपत्र बोगस आहेत. निवड केलेल्या व प्रतीक्षा यादीतीत बोगस प्रमाणपत्र व गुणांच्या आधारे मार्क वाढून घेतलेल्या उमेदवाराला बाद करून प्रतीक्षा यादीतील द्वितीय क्रमांकाच्या उमेदवाराची निवड करावी. ही भरती रद्द करण्यात यावी व जिल्हास्तरावर सुनावणी ठेऊन  सक्षम उमेदवाराची निवड करण्यात यावी अन्यथा

 दि. ११ मार्च २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम बु. येथे न्यायासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे  तालुका आरोग्य अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे दि ५ मार्च रोजी निवेदनाद्वारे विजय वाठोरे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments