माधव पवार
भारतीय जनता पार्टीचा चारित्र्यवान कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा व मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले शिवकुमार मेडेवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी काळाच्या पडद्या आड गेले असल्यामुळे विविध क्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहन्यात येत आहे
एक सच्चा मित्र व मार्गदर्शक हरपला अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी दिली व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे
शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या दरम्यान एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
नायगाव शहरातील बेळगे नगर पाटी जवळ एका दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला होता उपचारा दरम्यान दिनांक ९ मार्च २०२४ रोजी त्यांची प्राण ज्योत मावळली आहे
त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी नायगाव येते अंत्यसंस्कार करण्यात येणार आसल्याचे परिवाराच्या वतीने कळविले असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,भाऊ असा परिवार आहे.

0 Comments