Header Ads Widget

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळाव्यात मा. शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची विशेष उपस्थिती !!

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथे जयराज पॅलेस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नायगाव विधानसभा मतदार संघातील  बुथ प्रमुखाच्या कार्यकर्ता भव्य मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची अनुपस्थिती प्रमुख्याने होती

सध्याच्या परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर सह अन्य मातबर राजकीय पुढारी येणार असल्याचा वाजा गाजा झाला परंतु अचानक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची अनुपस्थितीमुळे रंगाचा भंग झाला असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळाली आहे 

जिल्ह्यातील नायागांव येथे या सभेच्या कार्यक्रमाला माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासह बूथ प्रमुखांची उपस्थिती होती

खरे तर जयराज पॅलेस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नायगाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थिती होते अशी चर्चा आहे

नायागांव येथे आयोजित करण्यात आलेल्या नायागांव विधानसभा मतदार संघातील बूथ प्रमुखाच्या भव्य मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आवाहन केले होते 


Post a Comment

0 Comments