Header Ads Widget

पोलिसांना फेसबुक वरून शिवीगाळ करून पोलिसांवर आरोप करणाऱ्या विरोधात सायबर ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल एक आरोपी अटक !!


नायगाव फास्ट न्यूज - नेटवर्क - 

फेसबुकवर  दिनांक २८ मार्च २०२४  रोजी प्रभाकर रुद्रघाटे या आरोपीने लोहा पोलीस येथील कर्मचाऱ्यांच्या संबंधाने स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून अश्लील शिवीगाळ केली व पोलिसांवर विविध खोटे आरोप केले होते 

या वरून लोहा पोलिसांमध्ये पोलिस अमलदार डफडे यांचे तक्रारी वरून सायबर ॲक्ट कलम ६७,६७ अ व भारतीय दंडविधान कलम २९४,५००,५०१,१८६,१८९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता

यामध्ये पोलिसांना असलेली शिवीगाळ करणे पोलिसांची बदनामी करणे पोलिसांच्या अब्रूचे नुकसान करणे. पोलीस करत असलेल्या  कामाबाबत खोटे आरोप करून लोकसेवा करत असलेल्या कामांमध्ये विविध पोस्ट टाकून अटकाव करणे. व कर्तव्य करत असलेल्या पोलीस लोकसेवकास धमकी देणे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशा प्रकारे फेसबुक वर केलेल्या बेकायदेशीर पोस्टला थम दाखवून त्यास समर्थन करून पोस्ट टाकण्यास सहाय्य केले म्हणून त्याचा सोबती ज्ञानेश्वर गाडेकर यास पण आरोपी करण्यात आले आहे

यातील मूळ आरोपी  प्रभाकर रुद्रघाटे हा लोह्याचा असून सध्या माजलगाव बीड येथे राहत होता 

पोलिसांची एक टीम पीएसआय रोडे साहेब किरपणे साहेब व संदीप कदम यांनी माजलगाव बीड येथे जाऊन सदर आरोपीस रात्री उशिराने अटक केली त्याचा मोबाईल जप्त केला.

आज रोजी आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयामध्ये सादर केले. पुढील गुन्ह्याचा तपास दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर पुढील तपास  करीत आहेत 

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये याच्यामध्ये अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सदर आरोपी पोस्ट टाकण्यासाठी अजून कोणी कोणी सहाय्य केले किंवा समर्थन केले याचा तपास सायबर सेल कडून चालू आहे.

Post a Comment

0 Comments