हिमायतनगर : नागोराव शिंदे :-:
हिमायतनगर तालुक्यात उष्णतेचा पारा वाढला असून उन्हाच्या दाहकतने जीवसृष्टी प्रभावित झाली आहे. मार्च शेवटच्या टप्प्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने शहरासह ग्रामीण भागातही पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहेत.
दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य जाणवत असून बाजारपेठेतील नागरिकांची रेलचेल मंदावली आहे. हिमायतनगर शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा निर्माण करण्यासाठी शासनाकडून १९ कोटी रूपयांची प्रभावी नळ योजना मंजूर झाली
परंतु, कामाला गती नसल्याने अजूनही शहराला पाणी मिळाले नाही, विशेष करून काम सुरू होवून दोन वर्षाचा कालावधी संपुष्टात येत आहे. संबधित कामाचे ठेकेदार हे प्रशासकीय यंत्रणेला मॅनेज करून कितीही दिवस काम चालूच ठेवत आहेत
सुधारित पद्धतीने मूल्यांकन करून निधी मात्र मोठ्या प्रमाणात लाटला जात असल्याचे सांगण्यात येते. शहराची सार्वजनिक नळ योजना भ्रष्टाचारात अडकली आणि आता ग्रामीण भागातही हे लोन पसरले आहे. तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे चालू आहेत
परंतु कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने मिळालेल्या योजनेचे फलित होतांना मात्र दिसत नाही. अनेक गावांच्या नळ योजना अर्धवट अवस्थेत आहेत. हिमायतनगरला पाईपलाईन करणाऱ्यांसाठी जवळपास सर्वच प्रमुख रस्ते खोदकाम करण्यात आले आहेत. परंतु खोदलेले रस्ते बुजवायला कोणीही तयार नाही. या रस्त्यावर रोजच अपघात होत आहेत.
पावसाळा दोन अडीच महिन्यावर येवून ठेपला असताना लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अशा अवस्थेत रस्ते या वर्षीच्या उन्हाळ्यात पूर्ण होतील की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे. उन्हाची दाहकता वाढली आहे. नागरिक सकाळीच कामे आटोपून घेत आहेत. सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी झाल्यानंतर बाहेर पडत आहेत. शहरांच्या अगदी शेजारुन वाहणारी पैनगंगा नदीही कोरडी पडली आहे
परिणामी पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. तालुक्यात उष्णतेचा पारा वाढला असून उन्हाच्या दाहकतने जीवसृष्टी प्रभावित झाली आहे. मार्च शेवटच्या टप्प्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने शहरासह ग्रामीण भागातही पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहेत. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य जाणवत असून बाजारपेठेतील नागरिकांची रेलचेल मंदावली आहे
हिमायतनगर शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा निर्माण करण्यासाठी शासनाकडून १९ कोटी रूपयांची प्रभावी नळ योजना मंजूर झाली. परंतु, कामाला गती नसल्याने अजूनही शहराला पाणी मिळाले नाही, विशेष करून काम सुरू होवून दोन वर्षाचा कालावधी संपुष्टात येत आहे. संबधित कामाचे ठेकेदार हे प्रशासकीय यंत्रणेला मॅनेज करून कितीही दिवस काम चालूच ठेवत आहेत
सुधारित पद्धतीने मूल्यांकन करून निधी मात्र मोठ्या प्रमाणात लाटला जात असल्याचे सांगण्यात येते. शहराची सार्वजनिक नळ योजना भ्रष्टाचारात अडकली आणि आता ग्रामीण भागातही हे लोन पसरले आहे. तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे चालू आहेत.
परंतु कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने मिळालेल्या योजनेचे फलित होतांना मात्र दिसत नाही. अनेक गावांच्या नळ योजना अर्धवट अवस्थेत आहेत. हिमायतनगरला पाईपलाईन करणाऱ्यांसाठी जवळपास सर्वच प्रमुख रस्ते खोदकाम करण्यात आले आहेत. परंतु खोदलेले रस्ते बुजवायला कोणीही तयार नाही. या रस्त्यावर रोजच अपघात होत आहेत
पावसाळा दोन अडीच महिन्यावर येवून ठेपला असताना लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अशा अवस्थेत रस्ते या वर्षीच्या उन्हाळ्यात पूर्ण होतील की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे. उन्हाची दाहकता वाढली आहे. नागरिक सकाळीच कामे आटोपून घेत आहेत. सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी झाल्यानंतर बाहेर पडत आहेत.
शहरांच्या अगदी शेजारुन वाहणारी पैनगंगा नदीही कोरडी पडली आहे. परिणामी पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत.

0 Comments