हिंगोली लोकसभेची उमेदवारी महायुती कडुन खासदार हेमंतभाऊ पाटील यांना जाहिर झाल्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित दादा गट, महायुतीचे पदाधिकारी एकत्र येत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.
बहुप्रतीक्षीत हिंगोली लोकसभेच्या जागेवर महायुती कडुन कोणाला उमेदवारी दिली जाईल यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उद्धान येत असतांनाच हि जागा भारतीय जनता पार्टीला कि शिवसेना शिंदे गटाला सुटेल हा संभ्रम जनतेत होता
अखेर दि. २८ गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या नावाची हिंगोली लोकसभे करीता उमेदवारी जाहिर केल्याने, महायुतीतील प्रतिक्षेत असलेल्या जागेचा तीढा सुटला, त्यानंतर हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरा समोर महायुतीचे कार्यकर्ते एकत्र येत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, मा. जीपस सत्यवृत्त ढोले, जि. महामंत्री गजानन तुप्तेवार, भाजपा ता. प्र. गजानन चायल, जि. महामंत्री आशिष सकवान, उप. जि. प्र. राजु पाटील, युवा सेना उप जि.प्र. गौरव सुर्यवंशी, युवासेना ता. प्र ज्ञानेश्वर पुट्ठेवाड, महिला आघाडी उप.ता.प्र. पुजा चव्हाण, महिला आघाडी श.प्र. रेणुकाताई साबळकर, श.प्र.गजानन हरडफकर,
राष्ट्रवादी कॉंग्रेस ता.प्र. अभिषेक लुटे, वसंतराव डवरे, बालाजी खोकले, रामदास भडंगे, शंकर वागतकर, भिमराव भिसे, , भाऊराव वानखेडे, सुनिल चव्हाण, विजय वळसे, गजानन गोपेवाड, संतोष साभळकर, शंकर भैरवाड, नागनाथ गुंडेवाड, परमेश्वर अग्रवाल, नृसिंग नाईक, संतोष शिरगिरे, दिलीप ढोणे, भाजपा शहर
प्रमुख विपुल दंडेवाड, विधानसभा संघटक बालाजी राठोड, सितल सेवनकर, दुर्गेश मंडोजवार, कल्याण ठाकुर, परमेश्वर नागेवाड, गजानन पिंपळे, बालाजी मंडलवाड, प्रकाश सेवनकर, विशाल शिंदे, नागेश अंधारे. लक्ष्मण डांगे, मारोती मोरे, रूपेश भुसावळे, विनायक ढोणे, लक्ष्मण ढाणके, शुध्दोधन हनवते, दिनेश राठोड, अनिल माने, संतोष बनसोडे, शंकर चव्हाण, संतोष पाटील, यांचेसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.

0 Comments