माधव पवार
नांदेड लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारातच्या संदर्भात नायगाव विधानसभा मतदार संघातील बूथ प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी सदस्यांचा मेळाव्याचे आयोजन दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी शिव मंगल कार्यालय नरसी येथे १२ वाजता आयोजित करण्यात आले आहेलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर राजेश देशमुख कुंटूरकर बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलंवडे यांच्या कडून मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांनी सांगितले आहे
नायगाव तालुक्यातील नरसी येथे शिव मंगल कार्यालयात भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण सदरील कार्यक्रमाचे उद्घाघाटन करणार आहेत
सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ अजित गोपछडे प्रमुख उपस्थिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेड लोकसभा प्रमुख उपस्थिती भास्करराव पाटील खतगावकर माजी राज्यमंत्री प्रमुख उपस्थिती सूर्यकांताताई पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे सदरच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले आहे

0 Comments