माधव पवारनांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात नायागांव येथे घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण प्रशिक्षणात एकूण १९१६ अधिकारी व कर्मचाऱ्या पैकी एकूण १७७९ अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्यामुळे त्यांना अप्पर जिल्हाधिकारी
स्वाती दाभाडे मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले आहे
त्या पैकी १३७ अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने त्याना नोटीसा बजावल्या असल्याचे कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी सांगितले आहे
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात पहिल्या सत्रात मतदान केंद्र अध्यक्ष पी आरओ सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष पी ओ एल असे एकूण ८६९ अधिकाऱ्याना प्रशिक्षण देण्यात येत आहेसकाळ सत्रात पहिले दोन तास सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान ४५० अधिकाऱ्याना पी पी टी प्रेसेंटेशन द्वारे निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रा वरील कर्तव्य विविध फॉर्म यावर माहिती देण्यात येत असली तरी सदरच्या प्रशिक्षणात १३७ कर्मचारी दिनांक ३० मार्च २०२४ अनुपस्थित होते नांदेड जिल्ह्यचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार नायगावच्या महिला तहसीलदार डॉ. धम्म प्रियाताई गायकवाड यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे
सदरच्या निवडणुकी पूर्वी १९१६ अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक २९ मार्च २०२४ पासून सदरचे प्रशिक्षण चालू करण्यात आले असल्यामुळे सदरच्या प्रशिक्षणात प्रशिक्षण घेत आहेत
0 Comments